घटस्थापना ते विसर्जन — नऊ दिवस देवी पूजन
नवरात्र उत्सवात घटस्थापना, नऊ दिवस देवीपूजन, व दहाव्या दिवशी विसर्जन असे विधी केले जातात. चैत्र व आश्विन असे वर्षात दोनदा नवरात्र येते. प्रत्येक दिवशी देवीच्या एका रूपाची आराधना केली जाते. घटस्थापनेत माती, जवारे (गहू), व कलश यांची स्थापना केली जाते. नवरात्रात उपवास, भजन, आरती व जागरण करण्याची परंपरा आहे. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून शमी पत्राचे वाटप केले जाते.
पूजेची संपूर्ण सामग्री यादी WhatsApp वर मिळवा किंवा डाउनलोड करा.